Sunday, 15 December 2013

तुझी आठवण


नेहमीच येते सुखकारक आठवण ऐसे नाही
आज अशी आली की.....
आसवेड्या पापण्यांना पेलावली नाही
सोसायास्तव तयास केले
त-हेत-हेचे लक्ष प्रयत्न
सोसली नच आठवण तुझी
मग उतू गेली आसवे माझी
त्यास पुसण्या जेव्हा
शोधू लागलो माझा रुमाल
आठवले की, तुलाच
देऊ केला होता काल
काल कुठे?
त्याला उलटून गेलेत कित्येक साल
विसरावे हे ही म्हणून
माळावरची रद्दी काढत बसलो
शून्य रिकामा बसून मग
चाळू लागलो कसले कागद
तुझीच होती शब्द गोंदणे
अन नाव तुझेच खाली
उंबया पर्यंत आलेलं मन
फिरलं पुन्हा उलट्या पावली
गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली

Featured post

जास्त

तुझ्या सोबत घालवलेले कांही क्षण क्षणां पेक्षा जास्त होते तुझ्यासोबत खाल्लेली चपाती चपाती पेक्षा खूप कांही होती त्यात होत्या माझ्या...